Students, parents participating in the Sunday Build a Fort workshop in the premises of Abhinav Bal Vikas Mandir
Students, parents participating in the Sunday Build a Fort workshop in the premises of Abhinav Bal Vikas Mandiresakal

SAKAL NIE: चिमुकल्‍या मावळ्यांनी जागविला गडकिल्ल्‍यांचा गौरवशाली इतिहास!

यशवंतराव चव्‍हाण सेंटर नाशिक जिल्‍हा केंद्राच्‍या कार्यशाळेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

SAKAL NIE : ऊर्जेने संचारलेली चिमुकले... मातीमध्ये रमताना मनमुराद आनंद घेताना बच्चेकंपनी... गडकिल्ल्‍यांचा गौरवशाली इतिहास जागविताना चिमुकल्‍या मावळ्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष केला.

रविवारी (ता. ५) गंगापूर रोडवरील मविप्र संस्‍थेच्‍या अभिनव बालविकास मंदिर शाळेच्‍या मैदानावर साकारलेले किल्‍ले लक्षवेधी ठरत होते. (SAKAL NIE glorious history of fort awakened by little ones Enthusiastic response to Yashwantrao Chavan Center Nashik District Centre workshop)

किल्ला बनवा कार्यशाळेत तयार झालेल्या किल्ल्यांची पाहणी करताना मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे
किल्ला बनवा कार्यशाळेत तयार झालेल्या किल्ल्यांची पाहणी करताना मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरेesakal

औचित्‍य होते ‘सकाळ एनआयई’ आणि यशवंतराव चव्‍हाण सेंटर जिल्‍हा केंद्र, नाशिकची प्रसिद्ध सराफ पतपेढी मयूर अलंकार यांच्‍यातर्फे दिवाळीच्‍या सुटीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘किल्ले बनवा’ कार्यशाळेचे.

रविवारी सकाळी साडेनऊला कार्यशाळेला सुरवात झाली. कार्यशाळेच्‍या सुरवातीपासूनच सहभागी चिमुरडे किल्‍ले साकारण्यात तल्‍लीन झाले होते. किल्‍ले बनविण्यासाठी लागणारी माती कार्यक्रमाच्‍या ठिकाणी उपलब्‍ध करून दिली होती.

दिवाळीच्‍या सुट्या म्‍हटल्‍या, की किल्‍ले बनविण्याचा आनंद हे सूत्र कायम राखत या कार्यशाळेचे आयोजन केले होते. इयत्ता तिसरी ते नववीतील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग होत किल्ले बनविले.

या कार्यशाळेसाठी ‘सकाळ’चे वितरण विभागाचे प्रतिनिधी अमित पवार, यशवंतराव चव्‍हाण सेंटर जिल्‍हा नाशिक केंद्राचे विक्रांत मते, ॲड. लोणारी, संगीता बाफना, व्‍यवस्‍थापक गणेश ढगे, भूषण काळे, डॉ. अशोक बोऱ्हाडे, संगीता सुराणा, अनिता दामले यांच्‍यासह सूरज गोसावी, ओंकार तालंगकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘सकाळ-एनआयई’चे समन्‍वयक मनोहर शिंदे यांनी आभार मानले.

सजावटीने आणला जिवंतपणा

किल्‍ले साकारताना विद्यार्थ्यांनी केलेली आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली होती.

काहींनी किल्ल्‍यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापित केली, तर काहींनी भगवा झेंडा फडकवत पताकांची सजावट केली होती. मावळे, प्राणी, पक्षी, वृक्ष आदींच्या सजावटीने किल्ल्‍यांत जिवंतपणा आणला होता.

पालकही रमले किल्‍ले बनविण्यात

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यशाळेत पालकांनाही सहभागाचा मोह आवरला नाही. पालकांनी ठाण मांडत किल्‍ले बनविण्यात बच्चेकंपनीला हातभार लावला. किल्‍ले साकारल्‍यानंतर या आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या.

कार्यशाळेत किल्ला बनवताना विद्यार्थ्यांची व पालकांची झालेली गर्दी
कार्यशाळेत किल्ला बनवताना विद्यार्थ्यांची व पालकांची झालेली गर्दीesakal
Students, parents participating in the Sunday Build a Fort workshop in the premises of Abhinav Bal Vikas Mandir
Sakal NIE : मोबाईलमधून मुलांना बाहेर काढण्यासाठी ‘एनआयई’

सर्व सहभागींचा बक्षिसाने गौरव

कार्यशाळेच्‍या समारोप कार्यक्रमाला यशवंतराव चव्‍हाण सेंटर नाशिक केंद्राचे अध्यक्ष व मविप्र संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, केंद्राचे सचिव प्रा. डॉ. अशोक पिंगळे, ॲड. राजेंद्र ढोकळे, अभिनव बालविकास मंदिर शाळेच्‍या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, मयूर अलंकारचे संचालक मयूर शहाणे, पवार बुक डेपोचे संचालक अतुल पवार, सुरेखा बोऱ्हाडे, ‘सकाळ’चे सहाय्यक व्‍यवस्‍थापक (वितरण) अभिजित गरुड, कलाशिक्षक सोमेश्‍वर मुळाणे उपस्‍थित होते. या मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ‘सह्याद्रीचा सुपुत्र’ हे पुस्‍तक आणि रायटिंग पॅड, सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यशाळेतून इतिहासाची उजळणी : ॲड. ठाकरे

समारोप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ॲड. नितीन ठाकरे म्‍हणाले, की मातीशी नाते जोडण्याची संधी उपलब्‍ध करून देताना या कार्यशाळेतून गडकिल्ल्‍याच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी

झाली आहे. पर्यावरणाशी जवळ जाण्याचा संदेश देताना दिवाळीतील सुट्यांमधील किल्‍ले बनविण्याचा आनंद, असे अनेक उद्देश या कार्यशाळेतून साध्य झाल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

कार्यशाळेतील क्षणचित्रे...

- सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

- कार्यशाळेत साकारले शंभराहून अधिक किल्‍ले

- किल्‍ले बनविताना मातीत रमले चिमुकले

- किल्‍ले साकारल्‍यानंतर छायाचित्र टिपण्याची लगबग

- इतर किल्‍ले पाहताना मित्र-मैत्रिणींना दिले प्रोत्‍साहन

- सजावटीसह वेगवेगळे किल्‍ले साकारण्यावर भर

- प्रश्नोत्तरातून किल्ल्‍यांविषयी रंजक माहिती, इतिहास जाणून घेतला

- सोशल मीडियावर छायाचित्रे अपलोड करण्यावर भर

सहभागी विद्यार्थी म्‍हणाले...

आदिती देवरे : कार्यशाळेत सहभागी होऊन खूप छान वाटले. आपल्‍यातील कल्‍पकता दाखविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली होती. दिवाळीच्‍या सुटीचा खऱ्या अर्थाने आनंद लुटता आला.

आदिती पाटील : मातीमध्ये खेळताना मनमुराद आनंद आम्‍ही लुटला. भरपूर नवनवीन गोष्टी या कार्यशाळेतून शिकायला मिळाल्‍या. अनेक विद्यार्थ्यांना आपले छंद जोपासण्याची संधी उपलब्‍ध झाली.

स्‍वस्तिश्री खर्डे : कार्यशाळेत सहभागी होण्याविषयी उत्‍साह होता. किल्‍ले साकारताना खूप मज्‍जा केली. सोबत किल्ल्‍यांचा गौरवशाली इतिहास या कार्यशाळेतून जाणून घेतला. सर्वच सहभागींसाठी हा अविस्‍मरणीय अनुभव होता.

Students, parents participating in the Sunday Build a Fort workshop in the premises of Abhinav Bal Vikas Mandir
Sakal NIE : चिमुकल्या हातांनी साकारले आकाशकंदील; ‘सकाळ-एनआयई’, शिवक्रांती उद्योगसमूहातर्फे कार्यशाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com