Sakal NIE Chitrakala Spardha
sakal
नाशिक/ पुणे: कागदावर उमटलेले रंग...अन् त्याद्वारे बालमनातील स्वप्नांना, कल्पनांना मोकळं आकाश मिळालं. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला कॅनव्हास मिळाला अन् प्रत्येक रेषेत, रंगांच्या नानाविध छटांमधून बालमनात दडलेल्या कुतूहलाला अन् उत्सुकतेला नवा आकार मिळाला. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सकाळ एनआयई चित्रकला स्पर्धे’चे.