Sakal People Culture Forum : भारतीय अधिष्ठानाची सुदृढ कार्यसंस्‍कृती गरजेची : विनोद बिडवाईक

Sakal People And Culture Forum
Sakal People And Culture Forumesakal

Nashik News : बदलत्‍या तंत्रज्ञानामुळे गेल्‍या पाच वर्षांत अनेक नवी पदे निर्माण झालेली आहेत. दुसरीकडे सध्याच्‍या युवा पिढीला नीतिमूल्यांवर आधारित, आदरभाव असलेली, मुक्‍तहस्‍त काम करण्याची संधी यांसह सन्‍मानपूर्वक वागणुकीची अपेक्षा आहे.

अनेक वर्षे पाश्चात्त्य शैलीनुसार मानव संसाधन विभागाचे कार्य होत आले आहे. परंतु भविष्याचा वेध घेताना भारतीय संस्‍कृतीच्या अधिष्ठानाशी संलग्‍न सुदृढ कार्यसंस्‍कृती (वर्ककल्‍चर) विकसित करण्याची आवश्‍यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन ‘सकाळ’चे संचालक (पीपल ॲन्ड कल्‍चर) विनोद बिडवाईक यांनी शुक्रवारी (ता. १६) केले. (Sakal People and Culture Forum inauguration Nashik News)

मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल सेवन ॲप्‍पल येथे आयोजित ‘सकाळ’ पीपल ॲन्ड कल्‍चर फोरमचा प्रारंभ व एचआर कॉनक्‍लेवप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी मोमेंटम ट्रेनिंग ॲन्ड डेव्‍हलपमेंट इन्‍स्‍टिट्यूटचे संचालक गजेंद्र मेधी, ‘सकाळ’च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांच्‍यासह ‘सकाळ’चे सरव्‍यवस्‍थापक (आयटी) दिनेश ओक, मुख्य व्यवस्थापक (एचआर) वासुदेव मेदनकर, वरिष्ठ व्‍यवस्‍थापक (एचआर) संजय पाटील, एबीबी कंपनीचे एचआर प्रमुख दयानंद कुलकर्णी, टेक्‍नोशेलचे तरीन शेख आदी उपस्‍थित होते.

Sakal People And Culture Forum
Nashik 11th Admission : 16 हजार विद्यार्थ्यांची पहिल्‍या फेरीसाठी नोंदणी; सहभागी विद्यार्थ्यांची संख्या कमी

श्री. बिडवाईक म्‍हणाले, विकसित, विकसनशील व अविकसित स्वरूपाच्या देशांमध्ये चढाओढ लागलेली असून, युवकांचा देश असलेल्‍या भारतामध्ये आघाडी घेण्याची क्षमता आहे. आज देशात बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर असला तरी कौशल्‍याधिष्ठित मनुष्यबळाचीही मोठ्या प्रमाणात आवश्‍यकता आहे.

त्‍यामुळे युवा पिढीतील गुणवत्ता शोधणे (टॅलेंट हंट) यांसह कौशल्‍ये विकसित करणे, त्‍यांना व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्याची जबाबदारी मानव संसाधन विभागाला पार पाडावी लागणार आहे. कोरोना महामारीनंतर सुदृढ आरोग्‍याला महत्त्व दिले जात आहे.

त्‍याअनुषंगाने युवा पिढीत संवेदना आणि सामाजिक सजगता निर्माण करणे, स्‍पर्धात्‍मक वृत्ती विकसित करणे, माहितीचे अचूक विश्‍लेषण, नवमाध्यमे हाताळण्याबाबत साक्षरता, कार्यकुशलता आदी गुणकौशल्‍यांचा विकास करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sakal People And Culture Forum
Nashik : हॅलो, मला शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे; आदिवासी विकासमंत्रीच असा कॉल करतात तेव्हा...

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर म्‍हणाले, की मनुष्यबळाला मानव संसाधन नव्‍हे, तर मानव संपत्ती म्‍हणून पाहण्याची आवश्‍यकता आहे.

संस्‍थात्‍मक पातळीवर ‘सकाळ’मध्ये गेल्‍या काही कालावधीत अनेक अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचे सकारात्‍मक परिणाम दिसू लागले असून, कार्यक्षमता वाढीसाठी याची मदत होते आहे. हे मॉडेल आता सर्वांसाठी ‘सकाळ’ने खुले केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना मोमेंटम ट्रेनिंग ॲन्ड डेव्‍हलपमेंट इन्‍स्‍टिट्यूटच्‍या श्‍वेता पिंगळे-कुलकर्णी यांनी फोरम व त्‍यांच्‍या संस्‍थेविषयीची माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. मेधा सायखेडकर यांनी स्‍वागत केले. नूपुर सिरोजकर यांनी आभार मानले.

Sakal People And Culture Forum
Nashik : हॅलो, मला शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे; आदिवासी विकासमंत्रीच असा कॉल करतात तेव्हा...

...म्‍हणून फोरमची आवश्‍यकता

स्वतःबद्दल सजगता निर्माण करताना कर्मचाऱ्यांमधील कार्यक्षमता वृद्धिंगत करण्याचे, त्‍यांचे स्‍वास्‍थ्‍य चांगले राखण्यासाठीची संरचना ‘सकाळ’ माध्यम समूहाने विकसित केलेली आहे. याचा फायदा कर्मचाऱ्यांना होत असून, केवळ संस्‍थेपुरती ही प्रभावी पद्धती मर्यादित राहू नये व विविध क्षेत्रातील आस्‍थापना, कंपन्‍यांतील मनुष्यबळाला या संरचनेचा फायदा व्‍हावा, या दृष्टिकोनातून ‘सकाळ’ पीपल ॲन्ड कल्‍चर फोरमची स्‍थापना केली आहे. या फोरमद्वारे संशोधन अहवाल व महत्त्वाची निरीक्षणे आदींबाबत माहिती आदान-प्रदान करणे सुविधाजनक होणार असल्‍याचे श्री. बिडवाईक यांनी नमूद केले.

Sakal People And Culture Forum
Nashik News : हॉकर्स धारकांकडून महिला पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण

काळाच्‍या पाऊलखुणा ओळखत

‘एचआर’मध्ये बदल आवश्‍यक : मेधी

कुठल्‍याही कंपनीचे धोरण हे तेथील कार्यशैली, कंपनीचे नेतृत्‍वाचा दृष्टिकोन यांसह अन्‍य विविध घटकांवर अवलंबून असतो.

सध्याच्‍या परिस्थितीत कार्यशैलीत बदल घडत असून, काळाच्‍या पाऊलखुणा ओळखून मानव संसाधन क्षेत्रात बदल करणे गरजेचे आहे, असे मत मोमेंटम ट्रेनिंग ॲन्ड डेव्‍हलपमेंट इन्‍स्‍टिट्यूटचे संचालक गजेंद्र मेधी यांनी केले. सध्याच्‍या परिस्‍थितीत मानव संसाधन व्‍यवस्‍थापन ही महत्त्वपूर्ण बाब बनली आहे.

काम करण्याची मोकळीक, ‘वर्क फ्रॉम होम’ यांसह अन्‍य नवीन संकल्‍पना रुजत असून, त्‍याअनुषंगाने विभागाची पुनर्रचना होणे अपेक्षित आहे, असे त्‍यांनी नमूद केले.

Sakal People And Culture Forum
Nashik News: समितीचा दौरा होता पेठला अन विमान उतरले इंदूरला! जलशक्ती समिती अध्यक्षांचे विमान भरकटले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com