Friendship : मैत्रीखातर स्वित्झर्लंड येथील उद्योजक मार्कस व्हेस्टनर खामखेड्यात घेणार विवाहसोहळ्याचा आनंद!

Markus Vestner
Markus Vestneresakal

Nashik News : जगातील सर्वात सुंदर , सहज आणि निकोप नाते कोणते असेल तर ते मैत्रीचे नाते ! मैत्रीचे नाते मागणी करते ते केवळ निर्व्याज मैत्रीची ! त्यात कुठलीच व्यावहरिकता नाही की कुठलीच अपेक्षा नाही की देवाणघेवाण नाही!

असते ती फक्त सुलभ , निष्पाप मैत्री! मैत्रीला कुठलेच बंधन नाही! ना वयाचे ना लिंगाचे ना जातीचे ना धर्माचे ना प्रांताचे ना राष्ट्राचे ! मैत्री ही या सर्वांच्या पल्याड आहे ! मैत्री ही एकच अशी गोष्ट आहे की ती वरील कोणत्याही बंधनात न अडकता खुलेपणाने ज्याच्याशी आपल्या मनाची व अर्थात मताची तार जुळते, त्याच्याशी करता येते.

अशीच डॉ. प्रकाश शेवाळे यांच्या लहान १० वर्षीय समीक्षा व तिची मैत्रीण ईश्वरी पगार या मुलींची ट्रेकिंग करतांना मैत्री झाली. (sake of friendship Marcus vestner CEO PFIFFNER entrepreneur from Switzerland enjoy wedding ceremony in Khamkheda nashik news)

फिफ्नार (PFIFFNER) ग्रुप नाशिकचे एम.डी. व सी. ई. ओ. व स्वित्झर्लंड येथील फिफ्नार(PFIFFNER) ग्रुपचे संचालक व उद्योजक मा. मार्कस व्हेस्टनर यांच्याशी. मराठीचे प्राध्यापक व साहित्यिक असणारे डॉ. प्रकाश शेवाळे मुलीसह दर रविवारी ट्रेकिंगला जातात. अन ट्रेकिंग व सायकलिंग ची प्रचंड आवड असणारे मा. मार्कस व्हेस्टनर यांची सुरुवातीला रामशेज किल्ल्यावर भेट झालीआणि या भेटीतून मैत्रीचे ऋणानुबंध हळूहळू घट्ट झाले.

मा. मार्कस व्हेस्टनर हे एवढे मोठे उद्योजक आहेत याची कुणालाही जाणीव नव्हती. मग दर रविवारी ट्रेकिंगचे बेत आखले जाऊ लागले त्यासाठी दुभाषक म्हणून समीक्षा काम करीत असते. त्यानंतर दुर्गभांडार, अंजनेरी, चामारलेणी, पांडवलेणी, ब्रम्हगिरी येथे ट्रेकिंग सुरु झाले आहे.

आपण कोणत्या कंपनीत काम करता असे विचारले असते मा. मार्कस व्हेस्टनर यांनी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दाखवले अन सर्वजण अवाक झाले. इतकी मोठी व्यक्ती सायकलिंग व ट्रेकिंग करताना अतिशय साधे जीवनमान जगते.

कंपनीची इनोव्हा गाडी, निसर्गरम्य व्हिला असून कुठलाही अतिरिक्त फायदा न घेता सामाजिक मुल्यांची जाणीव करून देते. समीक्षा च्या रुपात आपल्या नातवांना बघणारे मा. मार्कस व्हेस्टनर म्हणजे आपल्यासाठी एक आदर्श आहेत. स्वित्झर्लंड येथे त्यांचे कुटुंब असून या वर्षात त्यांचे कुटुंबही नाशिक येथे येणार आहे व आवर्जून खामखेड्याला भेट देणार आहे.

डॉ. शेवाळे यांची पुतणी पूनम व प्रसिद्द नाटककार दत्ता पाटील यांचे पुतणे केशव यांचा दिनांक २० मे रोजी विवाह आहे त्यानिमित्ताने १९ व २० मे या दोन दिवस मा. मार्कस व्हेस्टनर खामखेड्याला येणार आहेत. नुकताच समीक्षा व ईश्वरी पगार या दोन्ही मैत्रिणीनी मा. मार्कस व्हेस्टनर यांच्या अहिरानीतून घेतलेल्या शिकवणीचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला तो अतिशय प्रसिद्ध झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Markus Vestner
Love Vs Friendship : प्रेम की मैत्री? कसं ओळखाल तुमचं नातं

भारतात उद्योगाबरोबर येथील संस्कृतीचा व समाजमनाचा अभ्यास करणारे मा. मार्कस व्हेस्टनर हे एक गोष्टींच्या पुस्तकात अभ्यासावे असे आदर्शवत व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आईवडिलांनी टाकून दिलेल्या एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवले नुकताच तिचा विवाह एप्रिल महिन्यात स्वित्झर्लंड येथे झाला.

याचा सर्व खर्च मा. मार्कस व्हेस्टनर यांनी केला. कुठलाही देखावा करायला त्यांना आवडत नाहीत. एकूण २६ आंतरराष्ट्रीय पेटंट असणारे अनेक कौशल्ये आत्मसात केलेले मा. मार्कस व्हेस्टनर ये महनीय व्यक्तिमत्व आहे.

स्वित्झर्लंडहून आल्यावर त्याच दिवशी अनेक भेटवस्तू घेऊन मा. मार्कस अंकल सामिक्षाला भेटायला आले. आपल्या नातीसारखी भासणारी नटखट समीक्षा ही मा. मार्कस अंकल यांच्यासाठी अतिशय महत्वाची आहे.

सामिक्षाच्या आग्रहाखातर मा. मार्कस अंकल पूनमच्या लग्नाला दोन दिवस खामखेड्यात येणार आहेत. वधूवरांसाठी सध्या मा. मार्कस अंकल यांची खरेदी चालू आहे. मा. मार्कस यांची तीन मुले स्वित्झर्लंड येथे अतिशय मोठ्या पदांवर काम करतात.

मानवी मुल्यांची जपणूक करून आदर्शवत जीवन जगणारे मा. मार्कस अंकल म्हणजे एक आदर्शवत उदाहरण आहे. अशीच मैत्री बहरत राहो हीच सदिच्छा...

Markus Vestner
True Friendship : यारी लय भन्नाट हाय! मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी मित्रांनी परिक्षा सोडून जमवले ४० लाख!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com