दोन कॉलम
02774
साक्री ः विविध मागण्यांसाठी संप करताना दुय्यम न्यायालयीन कर्मचारी.
साक्रीत विविध मागण्यांसाठी
न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप
साक्री, ता. १८ : राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या संपात साक्री येथील दिवाणी न्यायालयातील कर्मचारी सहभागी झाले. होणार आहेत. मंगळवार (ता. १७) सुरू झालेल्या या संपामुळे न्यायालयातील कामकाजावरही परिणाम होणार आहे.
‘समान काम, समान वेतन’ या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. राज्यातील सुमारे ३४ हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार झाले आहेत. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना २००६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली असून, तीच वेतनश्रेणी दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शेट्टी आयोगाच्या शिफारशी राज्य शासनाने लागू केलेल्या नसल्याचा मुद्दाही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून कामकाज केले.
दुय्यम न्यायालयांत कर्मचारी कमी असून, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर त्याचा ताण पडत असून, अनेक न्यायालयांमध्ये पदे रिक्त आहेत. संगणकावर काम करण्यासोबतच मॅन्युअल पद्धतीनेही नोंदी व कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर दुहेरी कामाचा भार पडत आहे. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त तसेच सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थित राहून कामकाजाचा निपटारा करावा लागत असल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. संपात योगेंद्र शिरसाठ, माधवी चिंचोलीकर, श्वेता मोरे, नितीन बोरसे यासह न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी झाले आहेत.