साक्री पोलिसांचा छापा

साक्री पोलिसांचा छापा
Published on: 
धुळे : टुडे १ साठी... -- फोटो क्रमांक : 34398 साक्री : हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरील कारवाईत ताब्यात घेतलेल्या वाहनांसह पोलिस अधिकारी, कर्मचारी. -- साक्रीत जुगार अड्ड्यावर छापा -- सूत्रधारासह चालकावर गुन्हा; १७ लाखांचा माल जप्त सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. ३ : भाडणे (ता. साक्री) शिवारातील कारखाना फाटा येथे हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर साक्री पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत १७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणारे वाहने जागेवरच सोडून पसार झाले. याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह वाहन- चालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक ओंकार गवळी यांना सोमवारी (ता. २) भाडणे शिवारातील कारखाना फाटा येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये दिनेश राजेंद्र खैरनार (वय ३६, रा. मालपूर, ता. साक्री) याच्यासह काही जणांनी एकत्र जमून ५२ पत्त्यांच्या कॅटवर पैशांचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. मात्र, ते येण्याची कुणकुण लागताच जुगार खेळणारे आपली वाहने घटनास्थळीच सोडून पसार झाले. पोलिसांनी दहा लाख किमतीची हुंडाई क्रेटा कार, तीन लाख किमतीची मारुती सुझुकी इको कार, तसेच हिरो, बजाज, होंडा व सुझुकी कंपनीच्या नऊ दुचाकी, अशा एकूण १७ लाख ८० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दिनेश खैरनार याच्यासह जप्त करण्यात आलेल्या सर्व वाहनांच्या चालक व मालकांविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक तथा साक्री पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ओंकार गवळी, उपनिरीक्षक अशोक वळवी, संतोष मोरे, हर्षल इप्पर, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, प्रमोद पांचाळ, तुषार जाधव यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.