कोरोना काळात 'या' कंपनीची कामगारांना चक्क 10 हजारांची पगारवाढ!

company increment
company incrementesakal

सातपूर (नाशिक) : एकीकडे लॉकडाऊनमुळे (lockdown) रोजगाराचा (employment) प्रश्न निर्माण झाला असताना अशातच मात्र कामगारांना (workers) सुखावणारी बातमी आली.त्रैवार्षिक करारावर सकारात्मक चर्चा होऊन १० हजार ५०० रुपये पगारवाढ (salary increment) झाल्याचे समजले आणि कोरोनाचे संकट असतानाही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर वेतनवाढ करार पार पडला. कोणत्या कंपनीत ही पगारवाढ झाली?

कोरोना काळातही कामगारांना चक्क 10 हजाराची पगारवाढ!

अंबड औद्योगिक वसाहतीतील कोसो इंडिया कंपनी व्यवस्थापन व असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्कर्स युनियनमध्ये त्रैवार्षिक करारावर सकारात्मक चर्चा होऊन १० हजार ५०० रुपये पगारवाढ झाल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त एस. टी. शिर्के यांनी सांगितले. कोरोनाचे संकट असतानाही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर वेतनवाढ करार पार पडला. त्रैवार्षिक करारानुसार कामगारांना सरासरी १० हजार ५०० रुपये एवढी थेट रक्कम बेसिक वेजेस व अलाउंसेसमध्ये मिळणार आहे. पहिल्या वर्षी ६ हजार ३०० रुपये आणि दुसऱ्या, तिसऱ्या वर्षी प्रत्येकी २१०० रुपये पगारवाढ कामगारांना मिळणार आहे. करारानुसार कामगारांना रात्रपाळी, हजेरी भत्ता, पेड हॉलिडे, कामाकरिता भत्ता, कुटुंबीयांकरिता वर्षातून १ दिवस पार्टी सोहळा, मेडीकल पॉलिसीची विम्याची रक्कम ३ लाखांवरून ४ लाख करण्यात आली आहे.

company increment
नाशिकमध्ये वाडा खोदकामात सापडला भुयारी मार्ग! विविध चर्चांना उधाण

पगारवाढीव्यतिरिक्त आणखी बरेच काही

पगारवाढीव्यतिरिक्त कंपनी व्यवस्थापनाने ४ कामगारांच्या मुलांना त्यांचे शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार कंपनीमध्ये काम देण्याचे मान्य केले. २ कामगारांच्या मुलांना कायमस्वरूपी व २ कामगारांचे मुलांना प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून नेमणूक देण्याचे ठरविले. करार १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२३ या कालावधीसाठी आहे. करारानुसार कोसो व्यवस्थापनातर्फे व्यवस्थापकीय संचालक गौरव गुप्ता, उत्पादक विभागाचे जनरल मॅनेजर दिनेश दळवी, औद्योगिक संबंध विभागाचे जनरल मॅनेजर राजन भांडारे, युनियनतर्फे असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्कर्सचे अध्यक्ष भूषण सामंत, सरचिटणीस संजय कोळवणकर, उपाध्यक्ष वर्गिस चाको, कामगार प्रतिनिधी विजय महाले, भास्कर सुरूडे, राजू काळबांडे, परसराम आंबरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. व्यवस्थापन व युनियन कामगारांनी औद्योगिक संबंध अतिशय चांगले जोपासले आहे. हा करार याचीच प्रचिती असल्याचे युनियनचे सरचिटणीस संजय कोळवणकर यांनी सांगितले.

company increment
पोटात बाळ घेऊन कोरोनारुग्णांची सेवा करणारी गर्भवती हिरकणी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com