शालार्थ वेतन देयके सादर करण्यातील अडचणी दूर

शालार्थ वेतन देयके सादर करण्यातील अडचणी दूर
Published on: 
शालार्थ वेतन देयके सादर करण्यातील अडचणी दूर उपशीर्षक टॅब सुरू करण्यास परवानगी; समन्वय समितीच्या प्रयत्नांना यश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : शालार्थ प्रणालीतील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर तांत्रिक त्रुटींमुळे प्रलंबित राहणाऱ्या वेतन देयकांच्या प्रश्नावर माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या प्रयत्नांना यश आले आहे. शालेय शिक्षण विभागाने ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंतची आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या अटीवर संबंधित वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे वेतन देयके सादर करण्यातील अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे, डॉ. मिलिंद बागूल, सुनील गरुड, संदीप डोलारे, समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश नेमाडे, संतोष कचरे, उपाध्यक्ष गोविंदा पाटील, शिक्षक आमदार किशोर दराडे आणि पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनीही या प्रकरणी पाठपुरावा केल्याने संबंधित प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. शालेय शिक्षण विभागाच्या ९ ऑक्टोबरच्या पत्रानुसार, शालार्थ प्रणालीतील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मंजूर पदांपेक्षा अधिक पदे, तसेच डिजिटलायझेशन, जन्म तारीख, रुजू दिनांक, शालार्थ क्रमांक आणि इतर तांत्रिक त्रुटींमुळे वेतन देयके सादर करताना अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे वेतन देयके सादर करण्यास अडथळे येत असलेल्या शाळांना दिलासा मिळणार आहे. मात्र, वेतन देयकांची प्रत्यक्ष मंजुरी व वेतन जमा होण्यासाठी संबंधित त्रुटींची पूर्तता आणि प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com