नामपूर- महाराष्ट्राला लाभलेल्या शिवकालीन गड-किल्ल्यांच्या समृद्ध वारशात नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याने बागलाणसह संपूर्ण राज्यातील शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या मान्यतेमुळे गड-कोट संवर्धनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले गेले आहे.