नाशिक : विंचूरमध्ये सरदार विठ्ठल नरसिंहांच्या समाधीचा शोध?

Samadhi-of-Sardar-Vitthal-Narasimha-Vinchurkar
Samadhi-of-Sardar-Vitthal-Narasimha-Vinchurkaresakal

विंचूर (जि.नाशिक) : सहा वेशी अन्‌ तंटबंदीने बंदिस्त विणकरांचे गाव. विंचुरी बांड नावाची साडी पूर्वी प्रसिद्ध होती. गावातील नेहरू चौकात समोर किल्ल्यासारखा दिसणारा वाडा विंचूरकर घराण्याचा इतिहास सांगू लागतो. वाड्यामागे असणाऱ्या अनेक समाध्या लक्ष वेधून घेतात. त्यात विठ्ठल शिवदेवांच्या समाधीचाही समावेश आहे. किशोर गोरे व त्यांचे कुटुंबीय समाधीची देखभाल करतात. तसेच लोणगंगा नदीच्या बाजूला असलेल्या अनेक समाध्यांमध्ये सरदार विठ्ठल नरसिंह विंचूरकरांची समाधी असण्याचा अंदाज इतिहास अभ्यासक संजय बिरार यांनी वर्तविला. मात्र, संशोधनाअंती त्याचा खुलासा होईल. (Samadhi-of-Sardar-Vitthal-Narasimha-Vinchurkar-in-Vinchur-marathi-news-jpd93)

इतिहासाची अनेक दारे खुले होण्याची शक्यता

बिरार यांनी परिसरातील अनेक समाध्यांचा अभ्यास केलाय. त्यानुसार त्यांनी विठ्ठल नरसिंह विंचूरकरांच्या समाधीचा अंदाज वर्तवला आहे. ही समाधी इतर समाध्यांपेक्षा मोठी आहे. या समाधीच्या बाजूला प्राचीन बारव आहे. ग्रामस्थ तिला ‘सतीची बारव’ असे संबोधतात. ‘विंचूरकर यांच्या घराण्याचा इतिहास’ या ग्रंथात उल्लेख आढळतो. त्यामुळे समाधींचे संवर्धन होणे आवश्यक असून, त्यातून इतिहासाची अनेक दारे खुले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Picasa

विठ्ठल शिवदेव दाणी यांच्याविषयी

विठ्ठल शिवदेव दाणी १७२० च्या सुमारास स्वराज्यच्या सैनात दाखल झाले. १७४४ च्या सुमारास विठ्ठल शिवदेव विंचूरला आले. वाडा बांधून ते इथे राहू लागले. विठ्ठल शिवदेव दाणे विंचूरकर झाले. त्यांच्या पाच मुलांपैकी दोन क्रमांकाचा मुलगा खंडेराव विठ्ठल यांचे दत्तकपुत्र नरसिंह खंडेराव होते. नरसिंह खंडेराव विंचूरकर यांचा १७२९ (इ.स.१८०८) मध्ये मृत्यू झाला. नरसिंह यांची दुसरी पत्नी रमाबाई यांनी ऑगस्ट १८०८ मध्ये कारभारी बळोबाबा व इतर मंडळींनी पेशव्यांच्या परवानगीने दत्तक देऊन विंचूरचे संस्थान त्या दत्तक पुत्राच्या नावाने चालवले. दत्तक घेतलेल्या मुलाचे मूळ नाव केशवराव होते. मात्र, दत्तक घेणाऱ्या आईने त्याचे नाव बदलून विठ्ठलराव ठेवले. पुढे पेशव्यांच्या हुकुमावरून कवायती फौजेबरोबर विठ्ठलराव यांनी अनेक बंड मोडून काढली. इंग्रज व पेशवे यांच्यात युद्धजन्य परिस्थिती उद्‌भवली असताना, विठ्ठलराव पुण्यास हजर झाले. पुढे १८१८ मध्ये पेशव्यांनी इंग्रजांविरुद्ध उभारलेल्या युद्धात इंग्रजांची सरशी झाली. १८३६ च्या जानेवारीत त्यांचा आजाराने विंचूर येथे मृत्यू झाला. विंचूर येथे मृत्यू झाल्याचा उल्लेख विंचूरकर घराण्याचा इतिहास या ग्रंथात पाहायला मिळतो.

Samadhi-of-Sardar-Vitthal-Narasimha-Vinchurkar
कासव, विदेशी पोपटांच्या तस्करीचे रॅकेट! नांदगावला वनविभागाची कारवाई

अनेक दिवसांपासून विंचूरमध्ये फिरत असताना, मला समाध्या दिसत होत्या. अनेक वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाखाली तीन दगडी समाध्या आहेत. त्यातील एक मोठी आहे, ती विठ्ठल नरसिंह यांची असावी, असे मला वाटते. जवळ प्राचीन बारव आहे. या समाधींचा अभ्यास न झाल्याने इतिहास पुढे येत नाही. त्यासाठी समाध्यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. -संजय बिरार, इतिहास अभ्यासक, लासलगाव

विंचूरमध्ये आमच्या शेतात अनेक समाध्या आहेत. त्यातील मुख्य समाधी विठ्ठल शिवदेव यांची असून, त्याची देखरेख व स्वच्छता आम्ही ठेवत आहोत. बाकींच्या समाध्यांचे संशोधन होणे आवश्यक आहे. -किशोर गोरे, शेतकरी

आमच्या वंशजांच्या अनेक समाध्या गावात आहेत, पण त्याचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे कोणती समाधी कुणाची आहे, हे समजत नाही. आता आम्ही या ठिकाणी असलेल्या विंचूरकर संस्थांचे विठ्ठल शिवदेव यांची समाधी स्वःखर्चाने सुशोभित करणार आहोत. -डॉ. नारायण विंचूरकर, नाशिक

Samadhi-of-Sardar-Vitthal-Narasimha-Vinchurkar
नाशिकमध्ये हेल्मेट अभावी ५ वर्षात ३९४ बळी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com