टुडे पान २ साठी....अवतीभवती

टुडे पान २ साठी....अवतीभवती
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी....अवतीभवती -- वाग्देवता संस्थेस सेवा पुरस्कार जाहीर धुळे : समर्थ साहित्याचा प्रसार करणाऱ्या शहरातील प्रतिष्ठित श्री समर्थ वाग्देवता मंदिर संस्थेस साताऱ्याचा मानाचा समर्थ संत सेवा पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वसा जपणाऱ्या या संस्थेच्या कार्याची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. रविवारी (ता. १) दुपारी साडेचारला सातारा येथील समर्थ सदन येथे हा गौरव सोहळा होणार आहे. वारकरी संप्रदायाचे प्रबोधनकार प्रमोद जगताप यांच्या हस्ते संस्थेला हा पुरस्कार प्रदान केला जाईल. -- फोटो : 33907 रायफल शूटिंग स्पर्धेत विराजसिंह ठाकूरचे यश धुळे : नागपूर येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत येथील परमवीर रायफल व पिस्तूल स्पोर्ट शूटिंग क्लबचा खेळाडू विराजसिंह रणजीत सिंह ठाकूर याने १७ वर्षांखालील १० मीटर ओपन साईट रायफल गटात रौप्य पदक पटकावले. या यशाच्या बळावर त्याची नोव्हेंबरमध्ये गोवा येथे होणाऱ्या ७० व्या शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विराजसिंहला प्रशिक्षक कपिल बागुल व विपिन सोनवणे यांचे मार्गदर्शन झाले. त्याच्या या यशाबद्दल क्लबचे संस्थापक विशाल जोशी, अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर पिंपळे, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील, शासकीय क्रीडा प्रशिक्षक स्वप्निल बोढे, कार्यालयीन सदस्यांनी कौतुक केले. -- राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेसाठी आज चाचणी धुळे : ५३ वी सब ज्युनिअर महाराष्ट्र राज्य ज्यूदो स्पर्धेसाठी धुळे जिल्हा संघ निवड चाचणी शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी पाचला मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्र, मनमाड जीन येथे आयोजित करण्यात आली आहे, असे सचिव दिनेश बागूल यांनी कळविले आहे. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com