-----फक्त शहरसाठी
------------------
फोटो : B27071
येवला : माजी खासदार समीर भुजबळ यांना पुस्तके भेट देत सत्कार करताना ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे आदी
-------------------
समीर भुजबळांचा वाढदिवस
सेवाकार्याने साधेपणाने साजरा
-------------
सर्वरोगनिदान शिबिर, दिव्यांगांसाठी साहित्य, विद्यार्थ्यांसाठी वह्याचे संकलन
-------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ९ : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा नव्हे, तर समाजाप्रति बांधिलकी व्यक्त करण्याची संधीही आहे, ही भावना जपत माजी खासदार समीर भुजबळ यांचा वाढदिवस येथे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य उत्सवाला फाटा देत आरोग्यसेवा, पशुधनासाठी चारा, रुग्णांना फळवाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त साहित्याचे संकलन अशा सेवाभावी उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले.
येथील संपर्क कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दुष्काळी परिस्थितीचे भान राखत वाढदिवसाचा मोठा सोहळा आयोजित करण्याऐवजी समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्यावर भर देण्यात आला.
वाढदिवसाची सुरवात सर्वरोगनिदान शिबिराने झाली. पहिल्याच दिवशी ४०० वर नागरिकांनी याचा लाभ घेतला. शहरातील गोशाळेत जनावरांसाठी चाऱ्याचे वाटप करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. रुग्णांची विचारपूस करून त्यांना दिलासा देण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भेटवस्तू देण्याऐवजी समाजातील गरजूंना उपयोगी पडणारे साहित्य भेट देण्यास प्राधान्य दिले. यात शालेय साहित्य, वह्या, पुस्तके तसेच दिव्यांग बांधवांसाठी वॉकर, खुर्ची, कुबडी आदी साहित्याचा समावेश होता. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतर्फे समीर भुजबळांची पुस्तकतुलाही करण्यात आली. तीन ते चार हजार वह्या, हजारावर पुस्तके तसेच ५०० वर विविध प्रकारचे जमा झालेले साहित्य दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आणि गरजू व्यक्तींना वितरित करण्यात येणार आहे.
--------------