सामोडे येथे सोयाबीन पिकात चारल्या मेंढ्या

सामोडे येथे सोयाबीन पिकात चारल्या मेंढ्या
Published on: 
पान चार मेन ---------------- 01172 सामोडे : पावसाअभावी सोयाबीन पीक वाया गेलेल्या शेतात मेंढ्या चरताना. वाया गेलेल्या सोयाबीनच्या पिकात सोडल्या मेंढ्या सामोडे परिसरात शेतकरी संकटात; अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा सामोडे, ता. १६ : यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे सामोडे परिसरातील जेबापूर शिवारात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी दिलीप घरटे यांच्या शेतातील सोयाबीनच्या पिकाला शेंगाच न लागल्याने आणि झाडे सुकून गेल्याने तसेच उत्पन्न येणार नाही, ही वस्तुस्थिती स्पष्ट झाल्याने त्यांनी उभ्या सोयाबीनच्या पिकात मेंढ्या चरण्यासाठी सोडून दिल्या. यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने सामोडे व परिसरातील कोरडवाहू शेतीतील पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. सोयाबीनला वेळेवर पाणी न मिळाल्याने झाडे पार वाळून गेली आहेत. वर्षभर शेतीच्या मशागतीसाठी, बियाणे, खते आणि कीटकनाशकांसाठी केलेला मोठा खर्चही निघण्याची शक्यता उरलेली नाही. त्यामुळे पीक उभे ठेवून अतिरिक्त नुकसान सोसण्यापेक्षा ते जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ------- कर्जाचा डोंगर अन् पुढील हंगामाची चिंता शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. या हंगामात काहीच उत्पन्न मिळणार नसल्याने बँका व सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची? असा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर उभा ठाकला आहे. रोजचा घरखर्च, मुलांचे शिक्षण, येणारा पुढील हंगाम आणि जुन्या कर्जाचा डोंगर या सगळ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या, या चिंतेत शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. ---- प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षाच शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर करण्यात आले असले, तरी ते अद्याप प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही, अशी तक्रार शेतकरी करत आहेत. केवळ कागदावर किंवा घोषणांमध्ये अनुदान जाहीर न करता, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम तातडीने जमा होणे अत्यंत गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com