लखमापूर- राज्य अथवा केंद्र सरकारच्या कुठल्याही घरकुल योजनेसाठी लाभार्थ्याने स्वतःची जागा दिली असल्यास गाव नमुना ८ मध्ये मालक म्हणून लावण्यात येत असलेले ‘महाराष्ट्र शासन’ नाव आता रद्द करण्यात आले आहे. त्या जागी मालक म्हणून जागामालकाचेच नाव लावण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे मूळ जागामालकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना घरदुरुस्ती, कठीण प्रसंगी विक्री तसेच बॅंकेकडून कर्जही काढता येणार आहे.