Sonalee Kulkarni
sakal
नाशिक: रोजच्या रहाटगाड्यातील गर्दीचे जगणे, ट्रेनची कर्णकर्कश शिट्टी आणि सिग्नलवरचे ते मिनिटामिनिटाचे जीवघेणे वेळकाढूपण... यातून गर्द हिरव्या झाडांमधला तो मोकळा श्वास आणि गाजर गवतातून पायवाटेने चालत निश्चित स्थळी पोहोचणे असा मनमोकळा, कैफ असलेला दिवस अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अनुभवला. निमित्त होते, दुगाव, जानोरी व उंबरखेड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे.