नाशिक: मूळचे नाशिकचे असलेले लेफ्टनंट कर्नल संदीप रणदिवे यांना सैन्य दलातर्फे प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील पराक्रमाची दखल घेताना त्यांना ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडेशन कार्ड’ पुरस्कार जाहीर झाला. मोहिमेदरम्यान दाखविलेल्या अद्वितीय शौर्य, धाडस आणि नेतृत्वासाठी त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.