नाशिक- घराघरांतील मुलांवर संस्कार करणाऱ्या व मुलांसाठी संस्कारगीता ठरलेल्या ‘श्यामची आई’ या अजरामर आत्मकथेचे साने गुरुजी यांनी अवघ्या पाच दिवसांत ज्या खोलीत ठाण मांडून लेखन केले, ते प्रेरणास्थळ नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहाने आजही जतन करून ठेवले आहे.