Sangamner Meeting
sakal
संगमनेर: नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प नाशिक- सिन्नर- संगमनेर- अकोले- नारायणगाव-राजगुरुनगर- चाकण या मार्गानेच गेला पाहिजे, या ठाम भूमिकेसाठी जनआंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी (ता. २२) एक ऐतिहासिक सर्वपक्षीय बैठक पार पडली. ही बैठक संगमनेर तालुक्यातील एकोणावीस मैल (खंदरमाळ फाटा) येथील साईनाथ उद्योग समूह येथे व्यापक सहभागाने पार पडली.