Sangamner Municipal Election : संगमनेरमध्ये महायुतीला मोठा धक्का; ३० पैकी २७ जागांसह सेवा समितीची एकहाती सत्ता
Sangamner Municipal Election 2025: Complete Result Overview : सेवा समितीच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. नगराध्यक्षपदी डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी १६,४०८ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला असून २७ नगरसेवक निवडून आले आहेत.
राजू नरवडे संगमनेर: अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संगमनेर नगर परिषद निवडणुकीचा निकाल रविवारी (ता. २१) लागला असून, यामध्ये संगमनेर सेवा समितीने महायुतीला पराभूत करत एकहाती सत्ता मिळवली आहे.