आंतरराष्ट्रीय महिला गणित ऑलिंपियाडमध्ये सानिका बोराडेला कांस्यपदक

Medal
Medalesakal

नाशिक : लासलगाव येथील डॉ. अमोल बोराडे यांची कन्या सानिका हीने भारताकडून प्रतिनिधित्व करतांना युरोपियन महिला आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड (EGMO-EUROPEAN GIRLS MATHEMATICAL OLYMPIAD) मध्ये कांस्यपदक जिंकले आहे. हंगेरी येथे दिनांक ६ एप्रिल २०२२ ते १२ एप्रिल २०२२ या कालावधीत ही स्पर्धा झाली.

भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व चारही मुलींनी यात एकुण चार कांस्यपदक जिंकले आहेत. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड प्रमाणेच असून यामध्ये लागोपाठ दोन दिवस गणिताचे पेपर घेतले जातात. या स्पर्धेसाठी प्रत्येक देश चार मुलींचा संघ पाठवत असतो जगभरातून अनेक देश या स्पर्धेमध्ये भाग घेतात.

Medal
Cricket Alert : नाशिकच्‍या तन्‍मयने टिपले 13 बळी

संपूर्ण खर्च भारत सरकारने केला

या स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे झाली होती. सर्वात प्रथम प्रत्येक राज्यातून 300 विद्यार्थीनी निवडण्यात आल्या. त्यानंतर राज्यस्तरीय चाचणी घेण्यात येऊन 300 पैकी तीस मुलींची निवड करण्यात आली. यातून राष्ट्रीय गणित ऑलिंपियाड समितीने फक्त 60 मुलींची निवड केली. या साठ मुलींचे एक online प्रशिक्षण (आय एम ओ टी सी) घेण्यात आले. त्यानंतर साठपैकी भारतासाठी चार मुलींची निवड करण्यात आली‌. हजारो मुलींमधुन संपूर्ण देशभरातून फक्त ४ मुलींची निवड यावरून या स्पर्धेची काठिण्य पातळी लक्षात येते. त्यापैकी दोघी दिल्लीच्या तर एकजण पुण्याची आहे.

Medal
उमराणेत आता फोन केल्यास जागेवर मिळेल डिझेल | Nashik

या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे मुख्य मार्गदर्शक पुण्याच्या वाडिया महाविद्यालयाच्या डॉ. अदिती फडके तर बेंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेचे पुलकित सिन्हा उपप्रमुख होते. आय.आय .टी मुंबईच्या रोहीणी जोशी निरीक्षक म्हणून भारतीय संघासोबत होत्या.

लासलगाव सारख्या ग्रामीण भागातील असामान्य गुणवत्ता असलेल्या सानिका बोराडेने आंतरराष्ट्रीय पातळीवर कांस्यपदक जिंकल्याने तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com