NSK26H34930
जळगाव : आधार ज्येष्ठ नागरिक संघात ‘सांज पाडवा’ कार्यक्रम सादर करताना कलावंत.
-----
आधार ज्येष्ठ नागरिक
संघातर्फे ‘सांज पाडवा’
जळगाव, ता. १३ : दीपावली महोत्सवानिमित्त आधार ज्येष्ठ नागरिक संघ मुक्ताईनगर परिसर येथे ‘सांज पाडवा’ हा कार्यक्रम स्वरवेधतर्फे सादर करण्यात आला. या कार्यक्रमात सरस्वती माता प्रतिमापूजन अध्यक्ष डॉ. संभाजी देसाई, सचिव प्रकाश पाटील, भागवत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भागवत पाटील यांनी गायिलेल्या ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे गणेश स्तुति असलेले गीताने सुरुवात करण्यात आली. नंतर क्रमाने नीळकंठ कासार, योगेश पाटील, वैशाली जोहरे, प्रकाश पाटील, दिलीप चौधरी, भागवत पाटील यांनी विविध मराठी भक्तिगीते भावगीते अभंग देशभक्ती गीत गझलसह इतर प्रकार सादर केले. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘वाऱ्यावरती गंध पसरला’, ‘आकाशी झेप घेरे पाखरा’, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘गेला दसरा आली’, ‘धाव पाव स्वामी समर्था’, ‘गजाननाच्या चरणी जुळवू या हृदयाचे नाते’, ‘जीवा शिवाची बैल जोड’, ‘देहाची तिजोरी’ गीते सादर करण्यात आली. प्रकाश पाटील यांनी एक अहिराणी कविता आईवर सादर केली. पल्लवी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
-------