वैफल्यग्रस्त भाजपकडून राज्यात दंगलीचा कट - संजय राऊत

Sanjay Raut
Sanjay Rautesakal

नाशिक : सत्तेअभावी वैफल्यग्रस्त झालेल्या भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्यात दंगली घडविण्याचा कट आखला जात आहे. भोंगे लाऊन हिंदूत्व वाढत नाही. कोल्हापूरकरांनी त्यांचे भोंगे खाली उतरवले त्यानंतरही राज्यात भोंग्यांवरून घाणेरडं राजकारण सुरु आहे. मात्र भीमरुपी वज्र हनुमान मारुती हा सदैव आमच्याच पाठिशी आहे. कोल्हापूरच्या निवडणूकीत हा त्याचा दाखला आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

शिवसेनाप्रमुखांची कॉपी करण्याचा हा प्रयत्न...

खासदार राऊत दोन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राऊत म्हणाले की, नाशिक रामाची पवित्र भूमी आहे, पण काही लोक हनुमान चालिसा म्हणायला पुण्यात आणि मातोश्री समोर पोहोचले आहे. मातोश्रीच्या बाहेर हजारो शिवसैनिक जमा झाले आहे. अशी टीका करीत हिंदुत्व कुणाला शिकवता. ज्यांनी भाड्याने हिंदूत्व घेतले त्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये. कोल्हापूर पोटनिवडणूकाचा प्रचार शिगेला पोहोचला नेमके अशा वेळी काही लोकांनी भोंगे लावून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वातावरण निर्माण करुन अनुकूल निकाल मिळविण्याचा प्रयत्न झाला. पण त्याचा कुठलाही फायदा झाला नाही.

Sanjay Raut
'चंद्रकांतदादा हिमालयात जाणार'; पराभवानंतर काय म्हणाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष?

कोल्हापूरकरांनी त्यांचे भोंगे निकालातून खाली उतरवले. कोल्हापूरचा निकाल हा त्याचा दाखला आहे. शिवसेनाप्रमुखांनी विलेपार्ले भागात पोटनिवडणूकीत असा प्रयत्न केला होता. शिवसेनाप्रमुखांची भ्रष्ट कॉपी करण्याचा हा प्रयत्न केला गेला. आज हनुमान जयंती आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपले.

भीमरुपी वज्र हनुमान मारुती सदैव आमच्याच पाठिशी

राऊत म्हणाले की, यंदा रामनवमीला देशात दहा राज्यात दंगली झाल्या. ज्या राज्यात निवडणूका होणार आहे. अशा राज्यात दंगली घडवित वातावरण अस्थिर निर्माण करीत, निवडणूका जिंकण्याचा प्रकार देशात सुुरु झाला आहे. हनुमान चालिसा घेत राजकारण करणारे हनुमानाचे खरे भक्त असते तर हनुमान चालिसा पाठ असती. तथाकथित हनुमान भक्तांनी हनुमान चालिसा म्हणून दाखवावी. त्यांना राष्ट्रगीतही म्हणता येत नाही. हनुमान चालिसेच्या ओळी तरी म्हणून दाखवावी मी अख्खी हनुमान चालिसा म्हणून दाखवितो.

महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार अस्थिर घडविण्यासाठी दंगली घडविण्याचा कट रचला जात आहे. नवहिंदू ओवैसी आणि खरा ओवैसी यांचे कुटील कारस्थान सुरु असले तरी हे कारस्थान महाराष्ट्रातील जनता हाणून पाडेल. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा विरोधकांचा कुटील डाव आहे. महाविकास आघाडी सक्षम आहे. तिन्ही पक्षात भक्कम आघाडी आहे. मातोश्रीवर हजारो कार्यकर्ते जमले आहे. पण आमचे हात बांधलेले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीविरोधात जे बोलतील त्यांना केंद्राकडून सुरक्षा दिली जाते हे नवीन नाही. देशात इतक्या खालच्या स्तराचे राजकारण सुरु आहे. मे महिन्यात नाशिक शिवसेनेने अयोध्येसाठी एक कार्यक्रम आखला होता. मी काल नाशिकला आल्यावर इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अयोध्येतील कार्यक्रमाचे स्वरुप इतके मोठे झाले की, यात आदित्य ठाकरे यांना आमंत्रित करण्याचे ठरले. ते येणार म्हटल्यावर हा नाशिकपुरता कार्यक्रम न राहता तो राज्याचा कार्यक्रम ठरला. मे महिन्याच्या आसपास या कार्यक्रमाचे नियोजन सुरु आहे. महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचा आमचा संकल्प कायम आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्ता घेतल्यापासून कोविडसह अनेक संकटे आली. अशाही स्थितीत अनेक संकल्प पूर्ण केले. त्यासाठी अयोध्येत जाणार आहे. आम्ही आज अयोध्येला जात नाही. बाबरी ढाचा पाडला गेला तेव्हापासून आम्ही अयोध्येत जातो आहे.

कागदावरुन अटक होणार...

आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी त्यावेळी मोठा प्रयत्न झाला. विक्रांत ही देशाची संपत्ती आहे. ती वाचावी त्याचे संग्रहालय असावे अशी भूमिका होती. त्यावेळी किरीट सोमैय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी मोठा निधी गोळा केला गेला. अशी माहिती काही दिवसांपूर्वी पुढे आली. याप्रकरणी २०२२ मध्ये हा प्रकार पुढे आला आहे. ५८ कोटींचा हिशेब आम्ही मागतो आहोत. ५८ कोटी आकडा आणला कुठून असे आरोपी म्हणतो. कदाचित ५८ शे असतील पण यात सरळ सरळ देशाच्या भावनेशी खेळून भ्रष्टाचार केला जातो त्यांना मात्र न्यायालयात दिलासा मिळतो. काल मीरा भाईंदर महापालिकेतील १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा उघडकीस आला आहे. महापालिका आयुक्तांचा तसा अहवाल आहे. माझ्याकडे असलेल्या कागदपत्रांवरुन महाशयांना अटक होणार आहे. असाही दावा राऊत यांनी केला.

Sanjay Raut
भोंग्याचं राजकारण आजचं संपलं - संजय राऊत

संपर्क नेते भाउसाहेब चौधऱी, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर तसेच माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com