पुन्हा युतीचे राज्य आले का? नाशिक शहरात खुमासदार चर्चा | Sanjay Raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sanjay Raut visit to Nashik

पुन्हा युतीचे राज्य आले का? नाशिक शहरात खुमासदार चर्चा

नाशिक : शिवसेना किंवा शासनाच्या कुठल्याही निर्णयावर भाजपकडून टीका झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाची ढाल म्हणून पुढे होत भाजपच्या उत्तराला प्रत्युत्तर देत गारद करणारे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचे वैशिष्ट म्हणजे पत्रिकेवरील ज्या तीन कार्यक्रमांसाठी ते येत आहेत, त्यातील दोन कार्यक्रम भाजपचेच असल्याने पुन्हा युतीचे राज्य आले का अशी खुमासदार चर्चा शहरात सुरू आहे.

शिवसेनेचे प्रभाग २८ चे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते शनिवारी (ता. २०) होत आहे. त्यानंतर भाजपचे नगरसेवक व निमाचे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव यांच्या त्र्यंबक रोडवरील वॉटरपार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फ्लॉवर पार्कचे उद्‌घाटन सकाळी अकरा वाजता होईल. मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाहाला खासदार राऊत उपस्थित राहून नव वधु- वरांना आशीर्वाद देतील. जाधव भाजपचे असले तरी शिवसेनेच्या राऊत यांच्या हस्ते फ्लॉवर पार्कचे उद्‌घाटन आयोजित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील वर्षी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्‌घाटन केले होते. विवाहानिमित्त भाजपचे प्रदेश पातळीवरील नेत्यांची मांदियाळी असताना जाधव यांनी खासदार राऊत यांच्या हस्ते उद्‌घाटन आयोजित केल्याने राष्ट्रवादी किंवा शिवसेना या दोन पक्षांमध्ये ते प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: नाशिक | ST संपामुळे सिटीलिंक मालामाल; रोजचा गल्ला 10 लाखांपुढे

loading image
go to top