esakal | वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची!;संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची!- राऊत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नाशिक - वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. (Sanjay Raut replied to Chandrakant Patil)आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊत (mp sanjay raut) हे सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत,नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा ते आढावा घेत आहेत. (sanjay-raut-reply-chandrakant-patil-marathi-news)

वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान केले होते. त्यावर वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो. दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.

मोदी हेच भाजपाचे नेते

पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये, पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करता कामा नये, मग ते मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्र मोदी असतील. बाळासाहेब ठाकरेही हीच भूमिका मांडायचे. तसेच भाजपाला जे यश मिळत आहे ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच मिळत आहे. मोदी हेच भाजपाचे नेते आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा: भाजपला मिळालेलं यश हे मोदींच्या चेहऱ्यामुळेच: संजय राऊत

हेही वाचा: जिद्दीच्या जोरावर मनसे जिल्हाध्यक्षांनी केली पदवी संपादन

loading image
go to top