Arvind Sawant
sakal
नाशिक: देशभरात व्यभिचार पसरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने नाशिकमध्ये ठेकेदारांच्या घरातून एबी फॉर्मचे वाटप केले, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी केला. आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक अधिष्ठान असलेल्या नाशिकमध्ये कालपरवा गुंडांचा मेळावा पार पडला, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली. भाजपच्या व्यभिचारापासून नाशिककरांची सुटका करण्याची वेळ आली आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.