27355
कोपरगाव : जागतिक स्तरावर मानांकन प्राप्त केल्याबद्दल सत्कार करताना अमित कोल्हे व प्राध्यापक.
संजीवनी अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांची जागतिक स्तरावर दखल
संशोधना स्कॉलरली इंडेक्स्डच्या क्रमवारीत डॉ.सय्यद यांना स्थान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ : कोपरगाव (जि.अहिल्यानगर) येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व एमबीएच्या पाच प्राध्यापकांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक स्तरावर मानांकन प्राप्त केले आहे. या यशामुळे संजीवनीच्या संशोधनाभिमुख शैक्षणिक वाटचालीला जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण ओळख मिळाली आहे. ‘स्कॉलरली इंडेक्स्ड’च्या टॉप १००० स्कॉलर रँकिंगमध्ये महाविद्यालयातील डॉ. ए. एस. सय्यद, डॉ. भारती शिंदे, डॉ. रितेश पटेल, डॉ. नवीन कुमार आणि विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. दीपेश परदेशी यांनी विविध संशोधन क्षेत्रांत स्थान मिळविले आहे.
मानांकनात डॉ. ए. एस. सय्यद यांनी स्ट्रक्चरल अॅनालिसिस अँड ऑप्टिमायझेशन या संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर ८१ वा क्रमांक मिळविला असून त्यांचा इम्पॅक्ट स्कोअर ९५.३७ आहे. त्याच संशोधन क्षेत्रात डॉ. भारती शिंदे यांनी ९०. ०१ इम्पॅक्ट स्कोअरसह ६१६ वा क्रमांक प्राप्त केला आहे. डॉ. नवीन कुमार यांनी पावडर मेटलर्जी टेक्निक्स अँड मटेरियल्समध्ये १८५ वा क्रमांक मिळविला असून त्यांचा इम्पॅक्ट स्कोअर ६७. ५८ आहे. विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. दीपेश परदेशी यांनी आयओटी आधारित स्मार्ट होम सिस्टिम्स यात ८२.६१ इम्पॅक्ट स्कोअरसह २९२ वे स्थान प्राप्त केले आहे. डॉ. रितेश पटेल यांनी कस्टमर सव्र्हिस क्वालिटी अँड लॉयल्टी क्षेत्रात ७३.९२ इम्पॅक्ट स्कोअरसह ८६७ वा क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांना सर्वांचे अभिनंदन केले तर संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष अमित कोल्हे यांनी सर्वांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी संचालक डाॅ. आर. ए. कापगते उपस्थित होते.
--------
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापकांनी संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर मिळविलेले मानांकन ही संपूर्ण संजीवनी परिवारासाठी अभिमानाची बाब असल्याचे अमित कोल्हे यांनी सांगितले. प्राध्यापकांच्या या यशामुळे संस्थेची संशोधन संस्कृती अधिक बळकट होईल व भविष्यात जागतिक स्तरावर ठसा उमटविणारे संशोधन घडेल
अमित कोल्हे, अध्यक्ष संजीवनी विद्यापीठ