Sanskrit Rajya Natya Spardha : सोमवारपासून संस्कृत राज्य नाट्यस्पर्धा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanskrit Rajya Natya Spardha

Sanskrit Rajya Natya Spardha : सोमवारपासून संस्कृत राज्य नाट्यस्पर्धा!

नाशिक : ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीची तिसरी घंटा सोमवार (ता. ३०) पासून वाजणार आहे. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार आहे. (Sanskrit Rajya Natya Spardha from Monday nashik news)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

या स्पर्धेत विविध शहरांमधील ‘ओरिगामी’, ‘घटमिता बुद्धीः’, ‘तथास्तु’, ‘आस्फोटनं भोकरवाडेः’, ‘सत्यं शोधं सुन्दरम्’, ‘सुलोचना’, ‘कथा अन्वेषणस्य’, ‘तमोनैबद्ध्यम’, ‘वन्चितो परिवन्चीतो’, ‘प्राणवल्लभा’, ‘आलम्बः’, ‘खन्जमयूरः’, ‘मृत्यूः जन्मस्य’, ‘यमदूती’, ‘चिरंजीव’ या १५ संस्कृत नाटकांचे सादरीकरण होणार आहे. शहरातील नाट्यरसिकांना यानिमित्ताने संस्कृत नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे.