फन विथ फिलाटेली डे

फन विथ फिलाटेली डे
Published on: 
धुळे टुडे २ साठी... --- टपाल तिकिटांतून इतिहासाची ओळख --- सेंट अँथोनी स्कूलमध्ये ‘फन विथ फिलाटेली डे’ सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : राष्ट्रीय टपाल सप्ताह २०२६ अंतर्गत धुळे प्रधान डाकघरातर्फे शहरातील सेंट अँथोनी स्कूलमध्ये ‘फन विथ फिलाटेली डे’ उपक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांना टपाल तिकिटे संकलित करण्याच्या छंदाची ओळख करून देतानाच भारतीय टपाल विभागाचा इतिहास, परंपरा आणि आधुनिक सेवांची माहिती देण्यात आली. धुळे डाक विभागाचे प्रवर अधीक्षक एस. बी. ताठे आणि शाळेचे प्राचार्य फादर विल्सन रॉड्रिग्ज यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टपाल तिकिटांच्या प्रदर्शनातून देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. पत्रलेखन व पोस्टकार्ड लेखन, टपाल तिकिटांवर आधारित रचना व चित्रकला आणि भारतीय टपाल विभागावरील प्रश्नमंजुषा असे उपक्रम घेण्यात आले. विविध स्पर्धांतील सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे संकलित करण्याची आवड निर्माण करणे आणि पत्रलेखनाची परंपरा जपणे, हा उपक्रमाचा उद्देश होता. डाक विभागाचे बी. आर. पाटील, के. व्ही. पंचभाई, ए. ए. साळुंखे, के. बी. साळुंखे, के. बी. जाधव, डी. ए. सैंदाणे यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com