संत कबीर नगर अधिकृत करा

संत कबीर नगर अधिकृत करा
Published on: 
टूडे साठी ----------- संत कबीर नगर अधिकृत करावी झोपडपट्टी न्याय मंचाची मागणी; आयुक्तांना निवेदन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : संत कबीर नगरमधील वस्ती अधिकृत करावी आणि विकास आराखडा व रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सुरू असलेली निष्कासनाची कारवाई स्थगित करावी, अशी मागणी झोपडपट्टी न्याय मंचाच्या शिष्टमंडळाने आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडे केली आहे. संत कबीर नगरमध्ये अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहत असून, त्यांच्याकडे घरपट्टी पावत्या, आधारकार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे आहेत. काहींना रमाबाई आवास योजनेसह घरकुल योजनांचा लाभ मिळाला आहे. रहिवासी महापालिकेचे पाणी व इतर सुविधा घेत असून, नियमित करही भरतात. अशा स्थितीत घरे पाडल्यास हजारो कुटुंबे बेघर होतील, त्यामुळे मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. शासनाच्या धोरणानुसार शासकीय जमिनीवरील पात्र बांधकामे नियमानुकूल करण्याची तरतूद असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक २१/२०२५ वरील १६ जुलै २०२५ च्या आदेशाचा आणि २५ मार्च २०२६ च्या शासन पत्राचा संदर्भ शिष्टमंडळाने दिला. वस्ती आहे त्याच ठिकाणी नियमानुकूल करून रहिवाशांना कायदेशीर कागदपत्रे द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा महापालिकेवर धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव राजू देसले, मनोहर पगारे, ॲड. गणेश दहेज, समाधान शिलावट, विजय साहे, संदीप कदम आणि युवराज मनेरे यांचा समावेश होता. यावेळी उपमहापौर विलास शिंदे आणि गटनेते अजय बोरस्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com