सप्तशृंगी मातेला त्र्यंबकेश्वर देवस्थानचे महावस्त्र अर्पण कावडीच्या तीर्थाने महाअभिषेक; पैठणीसह अलंकारांचे समर्पण

सप्तशृंगी मातेला त्र्यंबकेश्वर देवस्थानचे महावस्त्र अर्पण कावडीच्या तीर्थाने महाअभिषेक; पैठणीसह अलंकारांचे समर्पण
Published on: 
फोटो-13372 सप्तशृंगगड ः श्री सप्तशृंगी मातेस महावस्त्र पूजाविधी साहित्य अर्पण करताना दोन्हीही ट्रस्टचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त-१ विवेक सोनुने, व्यवस्थापक अमित टोकेकर आदी. सप्तशृंगीमातेला त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे महावस्त्र अर्पण कावडीच्या तीर्थाने महाअभिषेक; पैठणीसह अलंकारांचे समर्पण सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २६ : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंग निवासिनी आई भगवतीला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी (ता. २५) श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्टतर्फे भरजरी पैठणी महावस्त्रासह विविध पूजासाहित्य अर्पण करण्यात आले. रविवारी महावस्त्र व पूजासाहित्याची सवाद्य मिरवणूक काढून विधिवत पूजेनंतर ते आदिमायेच्या चरणी अर्पण करण्यात आले. यात हातमागावर विणलेली पैठणी साडी-चोळी, मणी-मंगळसूत्र, नथ, जोडवे, भरजरी हार, फुले, गजरे, मिठाई, सुकामेवा तसेच सवाष्ण वाण व ओटीच्या साहित्याचा समावेश होता. महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि देवीप्रति श्रद्धा व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चार वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. या वेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे तसेच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष व धर्मादाय सहआयुक्त-१ विवेक सोनूने, व्यवस्थापक अमित टोकेकर, सुरक्षा विभागप्रमुख योगेश सोळंकी, सहाय्यक सुपरवायझर योगेश बेंडकोळी आणि अनिल सारूक्ते उपस्थित होते. .......... चौकट संत निवत्तिनाथांशी श्रद्धेचे नाते निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस आपली कुलस्वामिनी असलेल्या सप्तशृंगगडावर ध्यानधारणा केल्याचे संदर्भ सांगितले जातात. त्यामुळे या उपक्रमाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे. ............ कोट नवरात्रोत्सवात तुळजापूर येथील तुळजाभवानी माता, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी माता आणि कोजागिरी पौर्णिमेला माहूर येथील श्री रेणुका माता यांनाही देवस्थानची पैठणी साडी-चोळी, ओटी सर्व पूजाविधी साहित्य ट्रस्टी व व्यवस्थापक यांनी अर्पण केले आहे. - अमित माचवे, प्रशासकीय अधिकारी त्र्यंबकेश्वर देवस्थान .....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com