सप्तशृंग गड - दीपावली सुट्टीतही मंदिराची वेळ जैसे थे....

सप्तशृंग गड - दीपावली सुट्टीतही मंदिराची वेळ जैसे थे....
Published on: 
पान-१--मेन VNI26B13505 सप्तशृंगगड ः दीपावली सुट्टी आणि आठवड्याच्या शेवटाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी उसळल्याने मंदिर पायऱ्यांवर लागलेल्या बाऱ्या. ------------------- भाविकांची संख्या वाढती, दर्शनवेळ मात्र तीच ----------- सप्तशृंगगडावर सुट्यांमुळे गर्दी ः त्रिपुरारी पोर्णिमेपर्यत रात्री बारापर्यत वेळ वाढविण्याची अपेक्षा ----------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १४ : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिराच्या दर्शन वेळेत बदल होण्याची अपेक्षा असताना, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रशासनाने यंदा मंदिराच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे भाविकांना नियमित वेळापत्रकानुसारच श्री भगवतीचे दर्शन घेता येणार आहे. पूर्वीप्रमाणे रात्री बारापर्यत ही वेळ करण्यात यावी अशी मागणी भाविकांनी केली आहे. परराज्यातील अनेकांना गर्दीमुळे दर्शन घेता येत नसल्याने पहिल्या पायरीपासूनच परतावे लागत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. --------------- दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये राज्यासह परराज्यांतील शाळा, महाविद्यालये बंद असल्याने दरवर्षी सप्तशृंगगडावर भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवातील गर्दीमुळे दर्शन घेता न आलेले भाविक, तसेच पायी पालख्या आणि कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या या काळात वाढते. ही बाब लक्षात घेता दरवर्षी ट्रस्ट प्रशासनाने मंदिर दर्शनाची वेळ वाढवून मध्यरात्री बारापर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, यंदा असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरवर्षी भाऊबीज ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ट्रस्ट प्रशासनाकडून मंदिराच्या दर्शन वेळेत तीन तासांची वाढ केली जाते. नियमित पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेऐवजी मंदिर पहाटे पाच ते मध्यरात्री बारापर्यंत खुले ठेवण्यात येते. यामुळे गुजरातमधून पायी पालख्यांनी येणाऱ्या पदयात्रेकरूंसह सायंकाळी उशिरा गडावर पोहोचणाऱ्या भाविकांना दर्शन घेता येते. तसेच गर्दीचे विभाजन होऊन भाविकांना सुलभ दर्शनाची संधी मिळते. मात्र, यंदा सप्तशृंगगडासह त्र्यंबकेश्वर आणि काळाराम मंदिराला धमकीचा ई- मेल प्राप्त झाल्याने जिल्हा पोलिस दल सतर्क झाले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गडावर कडक पोलिस बंदोबस्त आणि विशेष खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रस्ट व प्रशासनाने मंदिराच्या वेळेत वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ---------- २०-२ चौकट सकारात्मक निर्णयाची अपेक्षा धमकीच्या ई-मेलला न जुमानता भाविकांचा आदिमायेच्या दर्शनासाठी मोठा ओघ सुरूच आहे. मर्यादित दर्शन वेळेमुळे रांगा वाढत असून, अनेक भाविकांना मंदिरातील प्रत्यक्ष दर्शनाऐवजी कळस आणि पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन माघारी परतावे लागत आहे. सुरक्षेच्या उपाययोजना कायम ठेवून किमान मध्यरात्री बारापर्यंत तरी मंदिर दर्शनासाठी खुले ठेवावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. गर्दीचे नियोजन आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रस्ट प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.