Nashik News: सप्तशृंगी मातेच्या महालक्ष्मी रूपाचे मनोहारी दर्शन ; आदिमायेच्या अलंकाराचे विधीवत पुजन...

Saptashrungi Temple : लक्ष्मीपूजनाच्या पर्वावर नाशिकमधील सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगी मातेचे महालक्ष्मी रूपातील मनोहारी दर्शन घडले. सुवर्णालंकार, आकर्षक पुष्पसजावट आणि विधिवत पूजनासाठी भाविकांनी गर्दी केली. दिवसभरात सुमारे २० हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
Devotees visit Saptashrungi Devi adorned in her Mahalakshmi form with traditional gold ornaments on Lakshmi Pujan.

Devotees visit Saptashrungi Devi adorned in her Mahalakshmi form with traditional gold ornaments on Lakshmi Pujan.

esakal

Updated on: 

वणी (नाशिक) : ‘सौभाग्यदात्री महालक्ष्मी, भक्तसदा वरदा... सप्तशृंग वास करूनी दर्शन देई जना... जनपूजितो लक्ष्मीपूजन व्रतपूजा... धनधान्य देई, वणीवासिनी सदा असो करुणा...’ अशा भक्तिभावपूर्ण प्रार्थनेतून धन, धान्य, ऐश्वर्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री असलेल्या आदिमाया सप्तशृंगी मातेच्या चरणी हजारो भाविकांनी लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर नतमस्तक होत सुख-समृद्धीचे साकडे घातले. स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा त्रिगुणात्मक स्वरूपातील सप्तशृंगी मातेचे महालक्ष्मी रूपातील तेजोमय दर्शन भाविकांसाठी श्रद्धा आणि भक्तीचा अविस्मरणीय सोहळा ठरले.

Loading content, please wait...