Saptashrungi Devi Temple
sakal
नाशिक
Wani News : आदिमायेचे सुवर्णरूप! सप्तशृंगगडावर अनुभवा निसर्गाचा अद्वितीय सोहळा; सुवर्णकिरणांनी मूर्ती न्हाली
Sacred Sunray Phenomenon at Saptashrungi Devi Temple : महासरस्वती, महाकाली व महालक्ष्मी स्वरूपी राजराजेश्वरी सप्तशृंगी मातेच्या गाभाऱ्यात रविवारी धनुर्मासातील चौथ्या आणि शेवटच्या रविवारी सूर्योदयाच्या वेळी सुवर्णकिरणांनी देवीच्या मूर्तीला स्पर्श केला.
वणी: ‘वेद ही हुकले अशी जगदंबेची महती.. सूर्यनारायणही आदिशक्तीस नमन करी..’ याचा प्रत्यय रविवारी (ता. ११) सप्तशृंगगडावर आला. महासरस्वती, महाकाली व महालक्ष्मी स्वरूपी राजराजेश्वरी सप्तशृंगी मातेच्या गाभाऱ्यात रविवारी धनुर्मासातील चौथ्या आणि शेवटच्या रविवारी सूर्योदयाच्या वेळी सुवर्णकिरणांनी देवीच्या मूर्तीला स्पर्श केला. हा नैसर्गिक किरणोत्सव सोहळा हजारो भाविकांनी ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला.
