Saptashrungi Trust protest
sakal
वणी: सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टविरोधात ग्रामपंचायत सदस्या बेबीबाई जाधव व सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव यांचे उपोषण शनिवारी (ता. २४) चौथ्या दिवशीही सुरू आहे. उपोषणकर्त्यांना ट्रस्टच्या सीटूप्रणीत कामगार संघटनेच्या सदस्यांच्या कुटुंबीयांनी पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी शनिवारपासून बिऱ्हाड आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.