वणी- महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगीमातेच्या आद्यशक्तिपीठात शनिवार (ता. ५)पासून नवचंडी याग व आदिमायेच्या पालखी मिरवणुकीने अनौपचारिकपणे चैत्रोत्सवास प्रारंभ झाला. रविवारी (ता. ६) रामनवमीला आदिमायेच्या पंचामृत महापूजेने परंपरेनुसार चैत्रोत्सवास प्रारंभ होईल. दरम्यान, शनिवारी आदिमायेस किन्नर आखाड्यातर्फे चांदीचा मुकुट महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी शिष्यगणांच्या उपस्थितीत अर्पण केला.