ऑक्टोबर हिटपासून बचावासाठी सप्तशृंगगडावर मंडपांचा आधार चांदणी चौकात प्रशस्त मंडप;

ऑक्टोबर हिटपासून बचावासाठी सप्तशृंगगडावर मंडपांचा आधार चांदणी चौकात प्रशस्त मंडप;
Published on: 
पान-१ ------------- VNI26B13216, VNI26B13217 सप्तशृंगगड ः चांदणी चौकात रस्त्यावर उभारलेला मंडप व शिवालय तलाव परिसरात भाविकांना विश्रांतीसाठी उभारलेला वॉटरप्रुप निवाराशेड. ---------- ४०-४ उन्हापासून बचावास गडावर मंडप, निवाराशेड ---------- एकाचवेळी हजारो भाविकांना बसण्याची व्यवस्था ः आरोग्यपथकेही सज्ज --------------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१४ : ऑक्टोबर हिटच्या वाढत्या झळांपासून भाविकांचे संरक्षण व्हावे आणि शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळावा, यासाठी सप्तशृंगगडावर मंडप व निवारा शेडची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. चांदणी चौकात प्रशस्त मंडप उभारण्यात आला आहे. शिवालय तलाव परिसरात एकाच वेळी हजारो भाविक बसू शकतील, असा डोम निवारा शेड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हात पायी प्रवास करणाऱ्या भाविकांसह महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सावलीत विसावा घेता येणार आहे. -------------- आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात राज्याच्या विविध भागांतून भाविक गडावर दाखल होत आहेत. यंदा ऑक्टोबर महिन्यात उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेषतः पायी गड चढणाऱ्या भाविकांना सावलीचा आधार मिळावा, यासाठी मंडप उभारणीवर भर देण्यात आला आहे. -------------- चांदणी चौकात प्रशस्त मंडप धोंड्याकोंड्या विहिरीजवळील बसस्थानकापासून गडावरील पहिल्या पायरीपर्यंतचे अंतर सुमारे एक ते दीड किलोमीटर आहे. हा टप्पा पार करताना अनेक भाविक तसेच कावडधारक अनवाणी पायांनी प्रवास करतात. अशा वेळी उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन चांदणी चौकात प्रशस्त मंडप उभारण्यात आला आहे. त्यामुळे पायी येणाऱ्या भाविकांना सावलीतून मार्गक्रमण करण्यास आणि काही काळ थांबून विश्रांती घेण्यास मदत होत आहे. १६-१ शिवालय परिसरात डोम शिवालय तलाव परिसरात एकाच वेळी हजारो भाविकांना बसता येईल, असा मोठा डोम वजा निवारा शेड उभारण्यात आला आहे. गडावर पायी येणारे भाविक, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरत आहे. दर्शनासाठी प्रतीक्षा करताना किंवा पायी प्रवासामुळे थकवा जाणवल्यास भाविकांना या निवारा शेडमध्ये सावलीत विसावा घेता येणार आहे. परिसरात पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्थाही ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. १६-१ आरोग्यसेवा, सुरक्षिततेवर भर नवरात्रोत्सवात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आरोग्यसेवा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघात, थकवा किंवा अन्य आरोग्यविषयक त्रास जाणवल्यास भाविकांना प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि भाविकांची सुरक्षितता यासाठी पोलिस व संबंधित यंत्रणा कार्यरत आहेत. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com