सप्तशृंगी देवीच्या महापूजेचा मान सामान्य भाविकांना द्या! नवरात्रोत्सव २०२६ पासून अंमलबजावणीची मागणी; ग्रामस्थांचे ट्रस्ट प्रशासनाला निवेदन

सप्तशृंगी देवीच्या महापूजेचा मान सामान्य भाविकांना द्या! नवरात्रोत्सव २०२६ पासून अंमलबजावणीची मागणी; ग्रामस्थांचे ट्रस्ट प्रशासनाला निवेदन
Published on: 
पान दोन ----------- 13206 सप्तशृंग गड : सामान्य भाविकाला पंचामृत महापुजेत सहभागी करुन घेण्याबाबतचे निवेदन ट्रस्ट कार्यालयात तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देताना ग्रामस्थ. सप्तशृंगी देवीच्या महापूजेचा मान सामान्य भाविकांना द्या ग्रामस्थांचे ट्रस्ट प्रशासनाला निवेदन; चालू नवरात्रोत्सवापासून अंमलबजावणीची मागणी सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १४ : श्री सप्तशृंगी देवीच्या पंचामृत महापूजेचा मान नवरात्रोत्सव व चैत्रोत्सवाच्या काळात सर्वसामान्य भाविकांनाही मिळावा, अशी मागणी सप्तशृंगगड ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट प्रशासनाला निवेदन देऊन नवरात्रोत्सव २०२६ पासून या मागणीची अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली. कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनीही यापूर्वी सामान्य भाविकांना पंचामृत महापूजेचा मान मिळावा, अशी भूमिका मांडली होती. या मागणीला पाठिंबा देत ग्रामस्थांनी ट्रस्ट प्रशासनाचे लक्ष वेधले. ट्रस्ट कार्यालयात विश्वस्त तसेच तहसीलदार प्रवीण वारुळे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. श्रीक्षेत्र सप्तशृंगगड हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सव आणि चैत्रपौर्णिमा उत्सवाच्या काळात राज्याच्या विविध भागांतून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. अनेक भाविक श्रद्धेने पायी प्रवास करून गडावर दाखल होतात. अशा सामान्य भाविकांनाही पंचामृत महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाल्यास त्यांच्या श्रद्धेचा सन्मान होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी ग्रामपंचायतीचे अजय दुबे, प्रकाश कडवे, अजय दुबे, दत्तू बर्डे, दिलीप बर्डे, माणिक सावंत, रमेश पवार, संदीप बेनके, राजेश गवळी, शांताराम सदगीर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या मागणीवर ट्रस्ट प्रशासन काय निर्णय घेते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com