

Saptashrungi Mata Temple Open 24 Hours for Devotees
Sakal
वणी : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती मंदिर उद्या मंगळवार (ता. ३०) पासून रविवार ४ जानेवारीपर्यंत नाताळ उत्सव संदर्भीय सुट्टयांचा कालावधी, शाकंबरी नवरात्रोत्सव, नववर्ष स्वागत निमित्त होत असलेल्या गर्दीच्या अनुषंगाने गर्दीचे व्यवस्थापन व भाविक - भक्ताना समाधानकारक दर्शन होणे दृष्टीने श्री भगवती मंदीर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.