पान-१
VNI26B13198
सप्तशृंगगड ः आदिमाया सप्तशृंगीचे नवरात्रोत्सवातील तिसऱ्या माळेचे तेजोमय रुप.
-----------------
गडावर तिसऱ्या माळेला गर्दीचा उच्चांक
--------------
उन्हाला न जुमानता दुपारनंतर वाढला भाविकांचा ओघ
-----------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.१३ : ऑक्टोबरच्या उन्हाचा चटका सहन करीत आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर मंगळवारी (ता. १३) नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला सुमारे २५ ते ३० हजार भाविकांनी दर्शन घेतले. मंगळवार हा देवीच्या उपासनेचा वार असल्याने दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला.
--------------
‘सप्तशृंगी माता की जय’, ‘आई राजा उदो उदो’ अशा जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनीही देवीचे दर्शन घेतले. तिसऱ्या माळेनिमित्त श्री भगवती सप्तशृंगी देवीची पंचामृत महापूजा धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार यांच्या हस्ते झाली. नाशिक धर्मादाय कार्यालयाचे अधीक्षक विशाल जाधव यांच्यासह ट्रस्टचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.
तिसऱ्या माळेला सकाळच्या सत्रात तुलनेने कमी गर्दी होती. मात्र, दुपारनंतर भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिराकडे जाणारा पायरी मार्ग भाविकांनी गजबजला. देवीचे तेजोमय आणि मनमोहक स्वरूप पाहण्याची उत्सुकता भाविकांमध्ये दिसून आली. मंदिरात दर्शनानंतर अनेक भाविकांनी मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीला साकडे घातले. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गेच्या चंद्रघंटा स्वरूपाची पूजा केली जाते. हे स्वरूप शौर्य, धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे धार्मिक वातावरणात देवीच्या दर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
१६-१
भाविकांसाठी सुविधा
गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिराच्या पायरी मार्गावरील पहिल्या पायरीजवळ नारळ फोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पायरी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि पथके तैनात असून, फिरते आरोग्य पथकही कार्यरत आहे.
------------------