Wani Gram Sabha
sakal
वणी: श्री सप्तशृंगी निवासिनीदेवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ निवडीच्या प्रक्रियेवरून ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विश्वस्त मंडळात स्थानिक भूमिपुत्रांना डावलले जात असल्याचा आरोप करत ग्रामसभेने विश्वस्त संख्या सातवरून अकरा करण्याची आणि त्यात पाच स्थानिक सदस्यांचा समावेश करण्याची मागणी करत तसा ठराव केला.