32083
सारंगखेडा : गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करताना रवींद्र बागुल, उपनिरिक्षक, किरण बारे, प्रवीण लोहार आदी.
गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना परत
सकाळ वृत्तसेवा
वडाळी, ता. १३ : सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत देण्यात सारंगखेडा पोलिसांना यश आले आहे. सीईआयआर पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत पाच मोबाईल शोधून मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले.
सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. या मोबाईलबाबत सीईआयआर पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. या प्रयत्नांतून चंद्रकांत शिवाजी पाटील (रा. शेल्टी, ता. शहादा), जितेंद्र विजयसिंग गिरासे (रा. बिलाडी बामखेडा, ता. शहादा), योगेश देवरे (रा. मंदाणे, ता. शहादा), विठ्ठल उत्तम चित्ते (रा. ससदे, ता. शहादा) आणि किरण भास्करराव कापडणीस (रा. लोहनार, ता. देवळा) यांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल पुन्हा देण्यात आले.
पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय अधिकारी गुलाबराव पाटील तसेच निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रवीण लोहार यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
मोबाईल गहाळ झाल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि सीईआयआर पोर्टलवर आवश्यक माहिती भरून तक्रार करावी.
- रवींद्र बागुल, साहाय्यक पोलिस निरिक्षक, सारंगखेडा