दिवाळी सणाला सरस्वती बँकेच्या सभासदांच्या पंधरा टक्के लाभांष खात्यात वर्ग : बाळासाहेब बोरस्ते

दिवाळी सणाला सरस्वती बँकेच्या सभासदांच्या पंधरा टक्के लाभांष  खात्यात वर्ग : बाळासाहेब बोरस्ते
Published on: 
पान दोन दोन कॉलम --------------- 14961 ओझर : सभासदांना लाभांशांचे वाटप करताना बाळासाहेब बोरस्ते. शेजारी संजय निकाडे, निवृत्ती धनवटे आदी. सरस्वती बँकेतर्फे सभासदांना लाभांश वर्ग ओझर, ता. २८ : सरस्वती बँकेला ३१ मार्च २०२६ आर्थिक वर्षाअखेर ८० लाख ४७ हजार दोनशे सत्तर रुपये निव्वळ नफा झाला होता. इतर तरतूदी वजा करता बँकेने सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची घोषणा केली होती. बुधवार (ता.२८) पासून बँकेकडून ४१ लाख १३ हजार ३०० रुपये सभासदांना वाटप करत रक्कम बँक खात्या वर्ग करण्याचा शुभारंभ करण्यात आला. असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बोरस्ते यांनी दिली. बँकेचे ४६९७ सभासद असून वसूल भागभांडवल २ कोटी ९८ लाख ४० हजार रुपये राखीव व इतर निधी ८ कोटी ८२ लाख ८४ हजार रुपये एकूण ५८ कोटी ३१ लाख २२ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. अहवाल काळात सभासदांना ३६ कोटी ६६ लाख ९१ हजारांचे कर्जवाटप केले आहे. बँकेने २७ कोटी रुपयांची गुंतवणुक केली आहे. आर्थिक वर्षात ८o लाख ४७ हजारांचा नफा झालेला आहे. बँकेचे खेळते भागभांडवल ७३ कोटी २९ लाख ६५ हजार रुपये असून सीआरए आरचे प्रमाण २२. ६९ टक्के असून सीडी रेशो ६२. ८८ टक्के आहे तर एनपीए ०.३४ टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे. असेही बोरस्ते यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय निफाडे, आदित्य बोरस्ते, किशोर मोरे, प्रभाकर कुयटे, संजय मोरे, चेतन बोरस्ते, मोहन पाटील, कुसुम ताकाटे, शोभा शिंदे आदींसह मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब ढोमसे, व्यवस्थापक प्रदीप बोरस्ते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com