सरस्वतीला आलेल्या पुराचा बळी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीपात्रात सापडला

Dead Body found
Dead Body foundesakal

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर शहरात गुरुवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीदरम्यान सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरी येतो असे सांगून बेपत्ता झालेल्या 35 वर्षीय परप्रांतीय तरुणाचा मृतदेह दातलीली शिवारात देवनदी पात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Saraswati flood victims body of missing youth was found in river bed Nashik Latest Marathi News)

Dead Body found
Chandrakant Chavanke Bribe Case : लाचखोर चव्हाणके यांना सशर्त जामीन मंजूर

सोनालाल दशरथ महंतो हा तरुण शाहू हॉटेल समोरील गोजरे मळ्यात पत्नीसोबत वास्तव्याला होता. तो मूळचा बिहार राज्यातील होता. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याने पत्नी रीना हीला फोन करून मी सिन्नर बस स्थानकाजवळ आलो आहे. घरी येताना मासे व भाजीपाला घेऊन येतो असे फोनवरून सांगितले.

मात्र तो उशिरापर्यंत घरी आला नाही व त्याचा फोन देखील बंद होता. घाबरलेल्या पत्नीने रात्री उशिरापर्यंत त्याच्या ओळखीतील मित्रांकडे तसेच सिन्नर परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांकडे चौकशी केली. सकाळपर्यंत सोनालालचा पत्ता लागत नसल्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सिन्नर पोलीस ठाण्यात सोनालाल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली,.

दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दातली शिवारात नदीपात्रात वाहून आलेला मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात कळवण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केल्यावर सोनालालच्या वर्णनाशी मृतदेहाचे वर्णन जुळले. त्याची पत्नी व नातेवाईकांना माहिती दिल्यावर त्यांनी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटवली. सिन्नर येथे सरस्वती नदीला आलेल्या महापुरात सोहनलाल वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dead Body found
Nashik : हायड्रोलिक शिडीची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com