सरस्वती माता वहनाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
महापौर दीपमाला काळेंच्या निवासस्थानी रंगला भजन-भारुड कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : ग्रामदैवत श्रीराम वहनोत्सवात शनिवारी (ता.१४) श्री सरस्वती मातेचे वहन उत्साहात काढण्यात आले. यावेळी सरस्वती वहनाचे दर्शन घेण्यासाठी वृद्ध महिला त्यांच्यासह तरुण वर्गाचे मोठी गर्दी झाली होती. वहन मार्गावर ठिकठिकाणी वहनाची पूजा व स्वागत भाविकांनी केले.
श्रीराम मंदिर संस्थान तर्फे सुरू रथ उत्सवामध्ये शनिवारी सरस्वती मातेचे वहनाची पूजा हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. सायंकाळी सात वाजता श्रीराम मंदिरातून वहन काढण्यात आले. भोईटे गढी, कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, विठ्ठल मंदिर, बाहेरपुरा, पांजरपोळ चौक, पंत नगर, श्री आप्पा महाराज समाधी, चित्रा चौक, मार्गे महापौर दीपमाला मनोज काळे यांच्याकडे पानसुपारी, भजन व भारूड कार्यक्रम झाला. यावेळी वहनाचे पूजन महापौरांनी केले. त्यानंतर वहन श्रीराम मंदिरात पुन्हा रात्री आले.
चौकट
आजचे वहन श्री शेषनाग
सर्पकुळाचा अनभिषिक्त सम्राट, पृथ्वी मस्तकावर धारण करणारा शेषनाग, तसेच भगवान विष्णूंचे शय्यास्थान होण्याचे भाग्य शेषनाग यास लाभले आहे. शेषनाग हे चांगल्या वाईट प्रवृत्तीसह, सुख दु:खाच्या भार मुकपणे वाहणारा म्हणून प्रतीक आहे. तसेच ईश्वरी सान्निध्यात सत्याचे सदाचाराचे सान्निध्य असलेले श्री शेषनाग रविवारी (ता.१५) वहनावर विराजमान होणार आहे.