सरदार चौकातील रखडलेल्या कामामुळे व्यावसायिक त्रस्त | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sewage repair work

सरदार चौकातील रखडलेल्या कामामुळे व्यावसायिक त्रस्त

नाशिक : श्री काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ गत अनेक दिवसांपासून रस्त्याचे व भूमिगत गटारींची कामे सुरू आहेत. ही कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे. (Sardar Chowk businessmen are suffering because of slow works of underground sewage nashik Latest Marathi News)

गंगाघाटासह पंचवटीच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर स्मार्टसिटीतंर्गत रस्त्याची व गटारींची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे रेंगाळल्याने त्याचा परिणाम व्यवसायांवरही होऊ लागला आहे. त्यामुळे ही कामे त्वरित पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यावसायिकांसह येथील रहिवाशांनी केली आहे.

श्रावण महिना म्हटले श्री काळाराम, कपालेश्‍वर, सीता गुंफा, तपोवन आदी ठिकाणी भाविकांची मांदियाळी असते. परंतु, रस्त्याच्या कामामुळे सरदार चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा हा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहे. यामुळे येथील व्यावसायिक व रहिवाशी त्रस्त आहेत.

"श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा ते सरदार चौक या रस्त्याचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होऊ लागला आहे."

- श्रीकांत खैरनार, संचालक, एसके टेलर्स

"सरदार चौकातून काळाराम मंदिराकडे जाणा-या रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे ज्येष्ठांना याचा मनस्ताप होत आहे."

- शरद दीक्षित, रहिवासी, सरदार चौक