नाशिक- साडी नेसणे प्रत्येक महिलेला आवडते पण पदर, मिऱ्यांची जुळवाजुळव करताना चांगलीच दमछाक होते. तसेच चांगली साडी नेसता येणे हेही प्रत्येकीस जमतेच असेही नाही, पण त्यावरही आता पर्याय निघाला आहे आणि तो महिलांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. गरजेतून रेडी टू विअर, पॉकेट इन साडी यांसारख्या साड्यांचे स्टार्टअप सुरू झाले आहे. त्यातून समाजमाध्यमांवर या साड्या अधिक ट्रेन्ड होऊ लागल्या आहेत.