पिंपळगाव- ‘ती आता आपल्यात नाही... पण तिची फुफ्फुसे कुणाच्यातरी छातीत श्वास घेतील, तिचे यकृत आणि मूत्रपिंडे कुणाच्यातरी शरीरात नवे जीवन फुलवतील!’ नाशिकच्या तिडके कॉलनीतील ४७ वर्षीय सरिता चोरडिया यांच्या आकस्मिक निधनानंतर, त्यांचे पती विनीत चोरडिया यांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. सरिताच्या मरणोत्तर दातृत्वामुळे ती मृत्यूच्या पारपारही ‘जिवंत’ राहिली आहे.