OZM26B14796
देवगाव ः आशियाई क्रीडा स्पर्धेत २.२५ मीटर उंच उडी मारून रौप्यपदक पटकावणारे भारताचे प्रमुख उंच उडीपटू सर्वेश अनिल कुशारे यांचा सत्कार करताना शांतिगिरी महाराज
-----------------
३०-२
आशियाई स्पर्धेतील यशाबद्दल
सर्वेशसह गुरुजनांचाही सन्मान
-------------
शांतिगिरी महाराजांच्या हस्ते गौरव
-------------
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता.६ ः आशियाई क्रीडा स्पर्धेत २.२५ मीटर उंच उडी मारून रौप्यपदक पटकावणारे भारताचे क्रीडापटू सर्वेश अनिल कुशारे यांचा देवगाव येथे झालेल्या सोहळ्यात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
देवगाव (ता.निफाड) येथील समस्त ग्रामस्थांतर्फे हा सोहळा झाला. सर्वेश कुशारे यांचे आई-वडील तसेच त्यांचे गुरुजन यांचाही सन्मान करण्यात आला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या सर्वेशने प्रतिकूल परिस्थितीत स्थानिक पातळीवर उंच उडीच्या सरावाला सुरुवात केली. उपलब्ध साधनसामग्रीच्या मर्यादा आणि विविध अडचणींवर मात करत त्यांनी मेहनत, जिद्द व सातत्याच्या जोरावर आपल्या क्रीडा कारकिर्दीला आकार दिला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत सर्वेशने आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील त्याच्या यशामुळे देवगावसह निफाड तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या यशाचा गौरव करताना शांतीगिरी महाराजांच्या हस्ते झालेला सन्मान हा देवगावकरांसाठी विशेष अभिमानाचा क्षण ठरला. दरम्यान शांतीगिरी महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
------------