Encroachment
sakal
सटाणा: येथील पालिकेने शुक्रवारी (ता.२०) सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलनाच्या कठोर कारवाईनंतर गटार स्वच्छता मोहीम हाती घेताच गटारींमध्ये वर्षानुवर्षे साचलेला प्लॅस्टिक, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व घन कचऱ्याच्या ढिगाने साक्री-शिर्डी राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या गटारी खचून भरल्या होत्या. या गटारींवरचे अतिक्रमण काढल्याने त्या पूर्णपणे मोकळ्या झाल्या.