Fake Currency
sakal
सटाणा: सटाणा शहर व परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात देणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून बनावट नोटांसह चार लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांत एका उच्चशिक्षित डॉक्टरसह सहा युवकांचा समावेश आहे. येथे देवमामलेदारांची यात्रा सुरू असून, त्यात या नोटांची पेरणी करण्याचा संबंधितांचा उद्देश असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.